‘इंदू सरकार’ चित्रपटाचा वाद शिगेला

Madhur-Bhandarkar get police protection
मुंबई: मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ चित्रपटावरुन सध्या वादंग सुरु असून काँग्रेस कार्यकर्ते चित्रपटाच्या प्रमोशनाचे कार्यक्रम उधळून लावत आहे. यामुळेच राज्य सरकारने मधूर भांडारकरांना सुरक्षा पुरवली आहे. शनिवारी पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद उधळून लावली होती. पुण्यापाठोपाठ रविवारी नागपुरातही चित्रपटविरोधात काँग्रेसने आंदोलन केल्याने भांडारकर यांना दोनही ठिकाणी आयोजित कलेली पत्रकार परिषद रद्द करण्याची नामुषकी आली. या प्रकारामुळे संतापलेल्या भांडारकर यांनी राहुल गांधींना ट्विट करून ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का?’ असा सवाल केला होता.