इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

indrayani express

डोंबिवली  : मध्य रेल्वे मार्गावरील वांगणी स्थानकादरम्यान इंद्रायणी एक्सप्रेसचे ब्रेकफेलमुळे झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे बदलापूर ते कर्जत डाऊन मार्ग बंद झाला आहे.

वांगणी स्थानकादरम्यान इंद्रायणी एक्सप्रेसखाली म्हैस सापडल्याने इंजिनामध्ये बिघाड झाला असून इंजिनाच्या पुढील बाजूच्या बम्परचे मोठे नुकसान झाले आहे. गॅस कटरच्या सहाय्याने दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

कर्जतहून सकाळी ७.५४ ला सुटणारी लोकल आणि८.१५ च्या सुमारास सुटणारी लोकल न आल्याने कर्जत स्थानकात गर्दी झाली आहे. इदनिमित्त शासकीय कर्मचा-यांना सुटी असली तरी निमशासकीय कर्मचा-यांचे मात्र हाल झाले आहेत.