राष्ट्रवादीच्या विदर्भातील एकमेव आमदाराला पक्षात घेण्यासाठी युतीत चडाओढ

टीम महाराष्ट्र देशा- विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार, माजी मंत्री तसंच जेष्ठ नेते मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपल्याला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी विचारणा केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

लोकसभेच्या दारूण पराभवानंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तसेच आघाडीतून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर चिरंजीव इंद्रनील नाईक हे देखील हाती बांधणार शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला असल्यानं इंद्रनील नाईक हे शिवसेनेच्या वतीनं निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे.