इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, साईप्रणीत उपांत्यपूर्व फेरीत

इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, साईप्रणीत उपांत्यपूर्व फेरीत

P. V. sindhu -b. Saipraneet

बाली : इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (Indonesia Open Badminton )भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू,(P. V. sindhu) अनुभवी बी. साईप्रणीत (b. Saipraneet)आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी(attviksairaj Rankireddy)-चिराग शेट्टी(Chirag Shetty) यांनी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित सिंधूने जर्मनीच्या योन ली हिला २१-१२, २१-१८ असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले.

आता पुढील फेरीत सिंधूचा दक्षिण कोरियाच्या सिम यू जी हिच्याशी सामना होणार आहे. तर पुरुष एकेरीत साईप्रणीतने बल्गेरियाच्या ख्रिस्टो पोपोव्हवर २१-१७, १४-२१, २१-१९ असा विजय मिळविला.आता साईप्रणीतची पुढील फेरीत किदम्बी श्रीकांत किंवा डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनशीसामना होऊ शकतो.

दरम्यान पुरुष दुहेरीत सहाव्या मानांकित सात्त्विक-चिराग यांच्या जोडीने दक्षिण कोरियाच्या कँग मिन्युक आणि सिओ सँगल यांना २१-१५, १९-२१, २३-२१ असे नमवले. आता त्यांचा नूर इजुद्दीन आणि गोह से फेई या मलेशियन जोडीसोबत सामना होईल.

महत्वाच्या बातम्या: