टीम महाराष्ट्र देशा: सरकारी परीक्षेची (Goverment Exam) तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी सरकारकडून मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रिया द्वारे केंद्र सरकार अनेक उमेदवारांना नोकरीची संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देत आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी, पदानुसार इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती मिळवण्यासाठी itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
विविध पदांच्या रिक्त जागा
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल यांच्या मार्फत कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 293 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 293 जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
शैक्षणिक पात्रता
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 293 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटला जाऊन शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
nmk.co.in या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार इंडो-तिबेट सीमा दल यांच्यामार्फत सुरू केलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार इच्छुक उमेदवार दिनांक 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
महत्वाच्या बातम्या
- Prashant Damle | प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- Shrikant Shinde | “मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे…”, तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राचं प्रत्युत्तर
- Uddhav Thackeray | “मशालच्या पहिल्या विजयानंतर मिंधे गट…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Gulabrao Patil | “… म्हणून ऋतुजा लटकेंचा विजय झाला”, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
- Bharat Jodo Yatra | अखेर प्रतिक्षा संपली! राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आजपासून महाराष्ट्रात, काँग्रेसकडून जोरदार तयारी