भारत-पाक महामुकाबला! नाणेफेक जिंकत पाकिस्तानने निवडली गोलंदाजी

भारत-पाक महामुकाबला! नाणेफेक जिंकत पाकिस्तानने निवडली गोलंदाजी

दुबई : भारत आणि पाकिस्तान या बहुचर्चित सामन्याला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. भारतीय संघाचा हा यंदाच्या टी-२० विश्वचषकातील पहिलाच सामना आहे. पाकिस्तानचाही हा पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघ पहिला विजय मिळवून स्पर्धेची चांगली सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनी दुबईत रंगणाऱ्या हायहोल्टेज सामन्यात विराट कोहलीवर अधिक दबाव असेल, असे मत मांडले आहे. बाबर आझम हा अजून नवखा आहे. त्याला एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी अजून काही अवधी लागेल, असा उल्लेखही त्यांनी केलाय.

भारत आणि पाकिस्तान T20 वर्ल्ड कपमध्ये 5 वेळा आमने-सामने आले आहेत. यात दरवेळी भारताने विजय मिळवला आहे. तर एकूण  T20 सामन्यांचा विचार करता 8 वेळा दोघेही भिडले असून भारत 6 वेळा तर पाकिस्तान 1 एकदा जिंकली असून एक सामना अनिर्णीत सुटला आहे.

अशी आहे भारताची अंतिम 11
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तानचे अंतिम 11
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.

महत्वाच्या बातम्या