भारत-चीन तणाव: चीनचा ‘फिंगर फोर’ वरून हटण्यास नकार

Indiaan Army

लडाख: गेले दीड महिन्यांहून अधिक काळ भारत व चीन सैन्यामध्ये नियंत्रण रेषेवर तणाव कायम आहे. दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेक चर्चा व बैठकी होऊन देखील हा तणाव पूर्णपणे संपत नसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, भारताने देखील आक्रमक पवित्रा घेतल्यांनंतर झालेल्या चर्चेतून अनेक भागातील दोन्ही देशांचे सैन्य मागे हटवण्यात आले होते.

मात्र, आता पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा भारतीय आणि चिनी सैन्यात तणाव शिगेला पोहोचु शकतो.  सध्या दोन्ही देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पूर्व लडाखमध्ये एकूण चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आले होते. त्यातल्या तीन ठिकाणी चिनी सैन्य माघारी फिरले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का?

पण पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळील फिंगर ४ वरुन मागे हटण्यास चीनने नकार दिला आहे. त्यामुळे चीनच्या या मुत्सद्देगिरीमुळे पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. झी न्यूज ने सदर वृत्त दिले आहे. तर, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कुठलीही आक्रमकता दाखवल्यास त्यांना लगेच प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने पूर्व लडाखच्या सीमेवर रणगाडयांची तैनाती वाढवली आहे. अजून धोका टळलेला नाही. भारतीय सैन्य पूर्णपणे हायअलर्टवर आहे.

‘सत्तेत असो वा विरोधी बाकांवर, हा विषाणू भेदभाव करत नाही’

चीनने फिंगर फोरमधुनही मागे हटावे ही भारताची मागणी आहे. एप्रिलच्या मध्यामध्ये जी स्थिती होती, तशी जैसे थे परिस्थिती पूर्ववत करा, असे भारताचे म्हणणे आहे. आता फिंगर एरिया कळीचा मुद्दा बनला आहे. आधी भारतीय सैन्य फिंगर आठ पर्यंत गस्त घालायचे. पण चिनी सैन्याने फिंगर फोर पर्यंत घुसखोरी केली आहे. चीनने पूर्वीप्रमाणे फिंगर आठ पर्यंत मागे फिरावे ही भारताची मागणी आहे. जर चीनने माघार घेतली नाही तर मात्र पुन्हा दोन्ही देशातील संघर्ष वाढून परिस्थिती चिघळू शकते.

कोणाच्याही धार्मिक भावणा दुखावणे योग्य नाही ; पण मग हिंदू धर्माच्या बाबतीत दुटप्पी का ?

दरम्यान, १७ व१८ जुलै रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाख, जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी दिल्लीत दाखल झाले आहेत. ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन नियंत्रण रेषेजवळील परिस्थितीची माहिती देतील.