#व्यक्तीविशेष : सहकार महर्षींचा समाजकारणाचा आणि राजकारणाचा वारसा विजयसिंहदादांनी अधिक समृध्द केला

vijay singh mohite patil

ज्ञानेश पवार : मोहिते पाटील ही सोलापुर जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणातली मोठी ताकद आहे.मोहिते पाटलांकडे कोणतेही राजकीय पद असो नसो पण समाजमनात मोहितेपाटलां विषयी आदराची भावना कायमच पाहायला आणि एकायला मिळते. राजकिय घडामोडी काही घडो मोहिते पाटलांनी समाज बांधिलकीची नाळ अजुनही तुटु दिलेली नाही.प्रसंगी राजकीय चप्पला ही त्यांनीबाजुला काढल्या आहेत.लोकांकडुन हव ते घेण, लोकांना हव ते देणं, ते देता याव यासाठी लोकांसाठीच कोणीतरी होण, ही सहकारमहर्षींची शिकवणुक जाणिवपुर्वक मोहिते पाटलांनी जोपासली आहे.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांपासुन चालत आलेला हा समाजकारणाचा आणि राजकारणाचा वारसा विजयसिंह मोहिते पाटलांनी सक्षमपणे संभाळला नव्हे तर तो अधिक समृध्द केला आहे.

अकलुजच्या सरपंच पदापासुन सुरु झालेली विजयदादांची राजकिय कारर्किद संसदेच्या पटलापंर्यंत गेली. सरपंच पद भुषवत असतानाच सोलापुर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि सर्वांना सोबत घेवुन जाणारा दादा नेता जिल्ह्याला मिळाला. जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष पदी १९७२साली निवड झाली त्यावेळी राज्यात तिव्र दुष्काळ पडला होता. पाण्याबरोबरच अन्नधान्याची भिषण टंचाई निर्माण झाली होती.सहकार महर्षींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही परिस्थीती समर्थपणे हाताळली.दरम्यान ७०च्या दशकाच्या अखेरीस सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे निधन झाले आणि मोहिते पाटील परिवारावर मोठा आघात झाला आणि कुटुंबातील मोठे या नात्याने विजयदादांवर मोठी जबाबदारी पडली.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटलांना विधान परिषदेची उमेदवारी

याकाळात मोहिते पाटील गटाला सावरणे आणि वाढवणे अशी दुहेरी जबाबदारी आपसुकच विजयदादांवर होती. १९७८च्या विधानसभा निवडणुकात वडिलांचा झालेला पराभव विजयदादांच्या जिव्हारी लागला होता. त्याच दरम्यान देशात राजकिय अस्थिरतेची परीस्थीती निर्माण होऊन १९८०ला मध्यावधी निवडणुका लागल्या विजयदादा माळशिरस विधानसभा मतदारसंघातुन निवडणुकिला उभे राहिले. तांत्रिक कारणांमुळे काँग्रेस पक्षाचे निवडणुक चिन्ह ही त्यांना मिळाले नाहीते शिडी या हे चिन्ह घेवुन निवडणुकिला सामोरे गेले आणि प्रचंड मतानी निवडुन ही आले. वडिलांच्या झालेल्या पराभवाचा बदला घेत पुन्हा मोहिते पाटील गटाची घौडदौड चालु केली आजही माळशिरस मतदारसंघ राखीव आसला तरीही तिथे मोहिते पाटील यांनी दिलेला उमेदवारच विजयी होत आला आहे.

आमदार,राज्यमंत्री विविध खात्याचे कॅबिनेट मंत्री,विरोधी पक्षउपनेते असा प्रवास करीत ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले दरम्यानच्या काळात त्याचे मुख्यमंत्री पदासाठीही नाव चर्चेत येत राहिले.विजयदादांनी,कृषी,पर्यटन सहकार ,परिवहन युवक कल्याण, पाठबंधारे, पाणलोट विकास, जलसिंचन,  क्रिडाविकास, रोजगारहमी, सांस्कृतीक, संसदिय कार्य, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास अशा तीन डझन खात्यांचा कारभार आपल्या राजकिय कारर्किदीत सांभाळला.सर्वांना बरोबर घेवुन जाणारा,विकासाच्या पातळीवर सर्वंकष योगदान देनारा, स्वपक्षीयांसह विरोधकांनाही आपलासा वाटनारा, अजातशत्रु नेता अशीच राज्याच्या राजकारणात त्यांची ओळख राहीली आहे.यामुळेच की काय २०१४ ला देशात मोदींची लाट असताना माढा मतदार संघात त्यांनी मिळवलेला हा त्यात्या वैयक्तीय करिष्म्याचा विजय मानला गेला.

कोरोनाबाबत भारताला इटली होण्यापासून लॉकडाऊनने वाचविले : आयसीएमआर

जिल्हा परिषद, लेबर फेडरेशन, दुध संघ, जिल्हा बँक, भुविकास बँक, राज्य बँक, साखर संघ, वसंतदादाशुगर इंस्टिट्युट, नॅशनल फेडरेशन दिल्ली, आॅल इंडिया इथेनाॅल असोशियशनआदि संस्थांच्या कारभारात विजयदादांची भुमिका महत्वाची राहीली आहे. संसदिय राजकारनात गेल्यावर राज्यातील कामाच्या दिर्घ अनुभवाच्या जोरावर त्यानी केंद्रीय स्तरावरील विविध योजना मतदार संघात आणल्या,माढा मतदार संघात माहामार्गाचे जाळे निर्माण केले,दादांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे१००वर्षाहुन अधिक काळ रेंगाळलेला,आणि देशाच्या विस्मृतीत गेलेल्या लोणंद ते पंढरपुर रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागले.आपल्या खासदार फंडातुन साडे सहाशेहुनअधिक गावात निधी पोहचवनारे ते देशातील एकमेव खासदार ठरले,तर लोकशाहीच्या मंदीरात संसदेत सलग पाच वर्ष मतदारसंघातल्या अडीअडचणींचे प्रश्न मांडणारे टाॅप टेन मधील खासदार ठरले.मिळेल त्या पदाची प्रतिष्ठा आपल्या कार्यातुन आणि वागणुकीतुन वाढवनारा नेता हिच ओळख दांदांनी निर्माण केली आणि जोपासली.

आज मोहिते पाटील गटाने पक्षांतर करुन भाजपाची कास धरली आहे. माढा मतदार संघावरही भाजपाचा झेंडा रोवला आहे. विजयदादांचे पुत्र रणजितसिंह भाजपकडुन नुकतेच विधानपरिषधेवर आमदार झाले आहेत.भाजपच्या प्रदेशअध्यक्षांनी विजयदादांवरही मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिलेले आहे त्यामुळे गेल्या १० वर्षातील मरगळ आलेल्या गटाला मोठी उर्जा मिळणार असुन सहकार महर्षींच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकिय पोकळीला विजयसिंह मोहिते पाटील यांनी संजीवनी दिली होती. तशीच २००९ नंतर पंढरपुर मधील विजयदादांच्या पराभवानंतर सोलापुर जिल्ह्यात निर्माण झालेल्या राजकिय नेतृत्वाच्या पोकळीला विजयदादांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील संजीवनी देऊन मोहिते पाटील गटाची आणि भाजपाची घौडदौड मार्गस्त करतील याची मोठी आशा आज सोलापुर जिल्ह्यात आणि पश्चीम महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.

…त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दारुची दुकाने उघडी ठेऊ नये – पाटील