एअर स्ट्राईक संदर्भात प्रश्न निर्माण करणाऱ्यांना अप्रत्यक्ष रीत्या चपराक

टीम महाराष्ट्र देशा : बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक नंतर आज वायुसेनेच्या प्रमुखांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. यामध्ये वायुदल प्रमुख बी. एस. धानोआ यांच्याकडून भारतीय वायुसेनेकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक संदर्भात सवीस्तर खुलासा करण्यात आला. तर एअरस्ट्राईक संदर्भात शंका व प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्ष रित्या चांगलीच चपराक बसली आहे.

यावेळी धनोआ यांनी शंका व्यक्त करणाऱ्या प्रश्नांना पूर्णविराम दिला. एअर स्ट्राईक बाबत अनेक विरोधी पक्षांकडून शंका व्यक्त केली जात होती. पण या शंकेच निरसन करण्यासाठी धनोआ म्हणाले की, एखाद्या ठिकाणाला निशाणा करुन तेथे हल्ला करण्याचं ठरवण्यात आल्यानंतरच आम्ही त्यावर निशाणा साधतो. आणि इथे आम्ही तो साधला. नाहीतर पाकिस्तानने या प्रकरणी वक्तव्य का केलं असतं? असा प्रश्न धानोआ यांनी उपस्थित केला. तर या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याबाबत बोलताना धनोआ यांनी याविषयीची माहिती सरकारकडून देण्यात येईल व मृतदेहांची मोजदाद करणे हे आमचं काम नाही असे खवचट शब्दात उत्तर दिले.

धनोआ यांच्या या पत्रकार परिषदेमुळे एअरस्ट्राईक संदर्भात शंका व प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्ष रित्या चांगलीच चपराक बसली आहे. कारण देश अत्यंत नाजूक परीस्थितून जात असताना काही नेत्यांनी देशाच्या सुरक्षा दलांवर अविश्वास व्यक्त केला असून बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे द्यावे अशी मागणी सरकारकडे केली होती पण धनोआ यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून असे निरर्थक मागण्या करणाऱ्यांची चांगलीच बोलती बंद केली आहे. धनोआ म्हणाले की , बालाकोट येथे एअर स्ट्राईक झाला असून, यामध्ये दहशतवादी तळांवर निशाणा साधला गेला.

दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार या जबाबदार नेत्यानी बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राईक संदर्भात शंका व्यक्त केली होती तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनेर्जी यांनी देखील सरकारकडे एअर स्ट्राईक संदर्भातले पुरावे मागितले होते.