लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच

लातूर: जिल्ह्यात संचारबंदीतही काही व्यापारी मागच्या दारातून विक्री करत आहेत. अशा व्यापारी व दुकानदारांवर प्रशासन कारवाई करत असले तरी देखील याला अजून तरी आळा बसला नाहीये. छुप्या मार्गाने व्यापरी मालाची विक्री करत आहेत त्याच सोबत द्देशी दारूची देखील विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. संचारबंदीत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असताना देखील नियम मोडून दुकाने चालू ठेवत असलेल्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील गांधी मैदानातील एका दुकानातून देशीदारू विक्री होत असल्याचे मंगळवारी सकाळी पोलिसांच्या निदर्शनास आले व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकानदारावर १० हजारांची दंडात्मक कारवाई केली. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहेत. मात्र काही लोक दुकाने चालू ठेवत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या डी झोन व गांधी चौक पोलिसांनी संयुक्तपणे दंडात्मक व कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मंगळवारी गांधी मार्केटमधील सिंध टॉकीजच्या मागील बाजूस असलेल्या एका देशीदारु दुकानातून छुप्या मार्गाने लोक जमवून दारुची विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकानदारास १० हजारांचा दंड आकारला व दुकान बंद करण्यास सांगितले. त्यानंतर हत्तेनगर येथे एक भांडी दुकान चालू होते, त्यास १५ हजार रुपयांचा दंड आकारला. तर जीन्स कपड्याचे एक दुकान उघडले होते, त्यास ६ हजारांचा दंड आकारला. असा एकूण ३१ हजारांच्या दंडाची कारवाई मनपाच्या डी झोनचे अधिकाऱ्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या