चीनवर आता स्वदेशी ‘भारत’ ड्रोनची नजर

drone

लडाख: भारत आणि चीन दरम्यान गेले काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. LAC म्हणजेच प्रत्येक नियंत्रण रेषेवरून लडाख मधील भागात चीन वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर या घुसखोरीचा भारतीय जवान देखील चोख प्रत्युत्तर देऊन या भागात भारताचे अस्तित्व अबाधित राखत आहेत. चीनने नियंत्रण रेषेच्या भागात हालचाली वाढवल्या होत्या त्यामुळे तणाव हा आणखी वाढत होता, तर दुसऱ्या बाजूला दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ होत होत्या.

याच दृष्टीने आता भारताने देखील सावध भूमिका घेतली असून आपण देखील सर्व परिस्थितींशी सामना करण्यास तयार असल्याचे वारंवार दर्शविले जात आहे. एवढंच नाही तर आता भारतानंही चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन तैनात केले आहेत. सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन व विकास संघटने(DRDO)ने पूर्वेकडील लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)च्या बाजूने उंचच उंच भागात आणि डोंगराळ भागात देखरेखीसाठी स्वदेशी बनावटीचे ड्रोन विकसित केले आहेत. संरक्षण सूत्रांनी एएनआयला सांगितले की, “पूर्व लडाख भागातील सुरू असलेल्या वादावर अचूक पाळत ठेवण्यासाठी भारतीय लष्कराला ड्रोनची आवश्यकता आहे.”

शरद पवारांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु,’सिल्व्हर ओक’वर पाठवणार १० लाख पोस्टकार्ड

या ड्रोनचे नाव देखील खास आहे. डीआरडीओच्या चंदिगड येथील प्रयोगशाळेत बनवलेल्या या ड्रोनला ‘भारत’ ड्रोन असे नाव देण्यात आले आहे. हे ड्रोन जगातील सर्वात चपळ आणि हलके असून पाळत ठेवण्यासाठीच्या यादीत समाविष्ट होऊ शकतात. डीआरडीओच्या सूत्रांनी सांगितले की, “तरीही लहान शक्तिशाली ड्रोन कोणत्याही स्थानावर मोठ्या अचूकतेसह स्वायत्तपणे काम करतात. प्रगत तंत्रज्ञानासह युनिबॉडी बायोमिमेटिक डिझाइन सर्विलान्ससह हे एक प्राणघातक शस्त्र आहे.”

शपथ घेताच उदयनराजेंचा ‘जय भवानी…जय शिवाजी’चा नारा,सभापतींकडून समज…

ड्रोनच्या काही खासियत देखील आहेत, चला त्या जाणून घेऊयात. ड्रोन कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असून, जे मित्र आणि शत्रू शोधण्यात आणि त्यानुसार कारवाई करण्यास मदत करतात. ड्रोन अतिथंड हवामान आणि तापमानात टिकून राहू शकतात, हे खराब हवामानासाठी देखील विकसित केले जात आहे. ड्रोन संपूर्ण मिशनमध्ये रिअल टाइम व्हिडिओ प्रसारित करते आणि रात्रीच्या दृष्टीने पाहण्याची चांगली क्षमता असलेले हे ड्रोन दाट जंगलात लपलेल्या लोकांना शोधू शकते. हे जंगलातील लोकांच्या हालचालींनाही योग्य टिपण्याचं काम करते. हे ड्रोन अशा प्रकारे तयार केले गेले आहे की ते रडारलादेखील सापडणार नाहीत.

प्रशासनाचा भोंगळ कारभार; पुण्याबाबत घडली ‘ही’ मोठी चुक

दरम्यान, भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर आता असे संशोधन मोलाचे ठरणारे असून काही दिवसांपूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख येथील आर्मी बेसवर जाऊन सैन्याचे मनोबल उंचावले होते. तर यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील अधिकाऱ्यांच्या भेट घेत जवनांशी संवाद साधला होता. यानंतर त्यांनी थेट फॉरवर्ड चौक्यांवर जाऊन परिस्थितीचा आढावा देखील घेतला होता.