या नेत्याचे एनडीए मध्ये सामील होण्याचे संकेत

amit shah

दिल्ली  : बिहार चे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी लालू यांची साथ सोडल्यानंतर भाजप बरोबर बिहार मध्ये सत्ता स्थापन केल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती . खर तर राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेसच या नाट्याचा अध्याय लिहिला गेला होता जेव्हा नितीश कुमार यांनी NDA चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठींबा दिला होता. पण नितीश कुमार यांचा भाजप शी सलोखा JD(U) चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांना काही रुचला नव्हता. त्यानंतर शरद यादव यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाटी सुरु केल्या होत्या. तर नितीश कुमार यांनी यांनी शरद यादव स्वतःचा निर्णय घेण्यास सक्षम आसल्याच वक्तव्य करून या वादात मिठाचा खडा टाकला होता .

त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्या घरी जाऊन त्यांना NDA मध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. आता या खुल्या निमंत्रणाला नितीश कुमार कसा प्रतिसाद देतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तर नाराज शरद यादव यावर काय वक्तव्य करतात हे पाहणे सुधा महत्वाचे असणार आहे.