प्रजासत्ताक दिनी भारताचा दणदणीत विजय; कुलदीपच्या फिरकी समोर नमले किवी

टीम महारष्ट्र देशा : माऊंट माऊंगानुई येथे झालेल्या भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडचे सर्व गडी बाद करून दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने हा सामना ९० धावांनी जिंकला असून या सामन्यात फलंदाजांं बरोबर भारतीय गोलंदाजांनी देखील आपल्या कामगिरीची चमक दाखवली. कुलदीप यादव ने न्यूझीलंडचे ४ गडी बाद करून न्यूझीलंड संघ खिळखिळा केला.

भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करत न्यूझीलंड समोर 325 धावांचे लक्ष्य उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाची सपशेल पडझड पाहिला मिळाली.भारतीय संघाच्या आक्रमक गोलंदाजांनी किवीच्या फलंदाजाना लवकरच तंबूचा मार्ग दाखवला. तर ब्रेसवेलने मात्र संघाची एक बाजू लावून धरत ५७ धावांची खेळी केली.

५ सामन्यांच्या या मालिकेत भारत २-० असा आघाडीवर असून आता भारताला मालिका जिंकण्यासाठी केवळ एक सामना जिंकण्याची गरज आहे.