सक्सेस रेट मध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी

टीम महाराष्ट्र देशा : सोमवारी न्यूझीलंडमध्ये 10 वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिका जिंकली. या विजयासह, 2015 च्या विश्वचषक स्पर्धेपासून आतापर्यंत भारताचा सक्सेस रेट 67.9% पर्यंत वाढला आहे. हा सक्सेस रेट जगातील इतर संघापेक्षा सर्वाधिक आहे. 30 मार्च 2015 पासून भारतीय संघाने 79 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी त्याने 53 जिंकले आहेत. दरम्यान, 2015 च्या विश्वचषकापासून भारताने आतापर्यंत जेवढे सामने खेळले आहेत त्यापैकी एक अफगाणिस्तान वगळता इतरांविरुद्ध सामना जिंकण्यात भारत यशस्वी झाला आहे.

इंग्लंडनंतर भारत सध्या सक्सेस रेट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा सक्सेस रेट भारतापेक्षा 0.85% कमी आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर इंग्लंडने 77 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. यापैकी 66.23 च्या सरासरीने त्यांनी 51 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका संघ असून आफ्रिका संघाने 68 पैकी एकदिवसीय सामन्यात 42 सामने जिंकले आहेत.

गेल्या विश्वचषकानंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 13 सामन्यांना पैकी भारताने सात सामने जिंकले आहेत. तर सहा सामने भारत हारला आहे. या सक्सेस रेट रॅकिंग मध्ये ऑस्ट्रेलिया 12 व्या क्रमांकावर आहे.