नवी दिल्ली : सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत (IND vs SA) भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीची सर्वत्र चर्चा होत असून सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. यातच भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव देखील जोडले गेले आहे, ज्याने गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे.
गुरुवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव करून भारताने सेंच्युरियन येथे पहिली कसोटी जिंकली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली असून या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संघासाठी मोहम्मद शमीने दोन्ही डावात सर्वाधिक 8 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने पहिल्या डावात पाच बळी आणि कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळींचा आकडाही गाठला.
Superb bowling by an attack that can pick 20 wickets in a Test match anywhere in the world.
Congratulations to #TeamIndia on a convincing victory!#SAvIND pic.twitter.com/2TGI41kH7B— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 30, 2021
या शानदार कामगिरीनंतर सचिन तेंडुलकरने संघाचे ट्विट करून अभिनंदन केले आहे. “भारतीय गोलंदाजी आक्रमण जगात कुठेही 20 बळी घेऊ शकते. अभिनंदन एका महान विजयासाठी”
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेची पोस्ट
- सिंधुदुसिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील
- सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- कंगनाने केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे आणखी एक तक्रार दाखल
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने चारली ‘मविआ’ला धूळ
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<