केरळ: केरळ राज्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, दुबईहून गेल्या आठवड्यात आलेल्या 31 वर्षीय व्यक्तीच्या तपासणीत मंकीपॉक्स आजाराचा विषाणू आढळून आला आहे. ही देशातील मंकीपॉक्सची ही दुसरीच घटना आहे. पहिला रुग्ण देखील केरळमध्येच आढळून आला होता. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांची सखोल तपासणी केली जात आहे.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, १३ जुलैला केरळमध्ये पोहोचलेला रुग्ण कन्नूरचा रहिवासी आहे. त्याच्यावर ‘परियाराम मेडिकल कॉलेज’मध्ये उपचार सुरू आहेत. या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांची तपासणी केली जात आहे. तर आता केरळमध्ये मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून तिरुअनंतपुरम, कोची, कोझिकोड आणि कन्नूर या विमानतळांवर हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत.
मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अनेक प्रकारची लक्षणे आधीच दिसू लागतात. जसे की डोकेदुखी, ताप, अंगदुखी, पाठदुखी, थंडी वाजून येणे, थकवा जाणवणे, चेहऱ्यावर व तोंडाच्या आत फोड येणे, हात व पायांवर पुरळ येणे. सध्या केरळमध्ये सापडलेल्या दोन्ही रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ‘अंडर ऑबजर्वेशन’मध्ये ठेवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : फुटीर गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतात?; संजय राऊत आक्रमक
- Anu Agrawal | आशिकी गर्ल अनु अग्रवाल यांनी शेयर केला ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबतचा जुना फोटो
- Ben Stokes : बेन स्टोक्सच्या निवृत्तीवर विराट कोहलीची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…!
- Shivsena : शिवसेना खासदारांचा संसदेतही नवा गट?, राहुल शेवाळे नवे गटनेते होणार?
- Ben Stokes : मोठी बातमी! इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्स वनडे क्रिकेटमधून निवृत्त
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<