Share

IND vs NED । भारताचा नेदरलँड्सवर 56 धावांनी दणदणीत विजय

IND vs NED | नवी दिल्ली : आज T20 विश्वचषक 2022 चा 23 वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सवर 56 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आज कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान आजच्या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्सला 180 धावांचे लक्ष दिले. रोहित शर्मा, विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावले.

भारताचा खेळ-

आज टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. उपकर्णधार केएल राहुल तिसऱ्या षटकात केवळ 9 धावा काढून पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे पॅव्हेलियनमध्ये परतला. नेदरलँडच्या गोलंदाजांनी पहिल्या 6 षटकांत आपली पकड घट्ट केली आहे. पॉवरप्लेमध्ये भारताने 1 गडी गमावून 32 धावा केल्या होत्या. भारताने 9व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. 10 षटकांत भारताने 1 गडी गमावून 67 धावा केल्या. रोहित आणि कोहली यांच्यातील अर्धशतकी भागीदारीही याच काळात पूर्ण झाली. रोहित शर्मानेही वेग पकडत 35 चेंडूत 29 वे अर्धशतक झळकावले, तो 53 धावा करून क्लासेनचा बळी ठरला. त्यानंतर कोहली आणि सूर्यकुमार यादवने धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले.

सूर्यकुमार यादवने 95 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले. तर डावाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार ठोकला आणि 25 चेंडूत 51 धावा केल्या. कोहली 62 धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे भारताने 2 बाद 179 धावा केल्या. नेदरलँड्ससमोर आता 180 धावांचे लक्ष आहे.

नेदरलँड्सचा खेळ –

180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड संघाला तिसऱ्या षटकात 11 धावांवर पहिला धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने विक्रमजीत सिंगला क्लीन बोल्ड केले. पाचव्या षटकात 20 धावांवर नेदरलँड्सला दुसरा धक्का बसला. अक्षर पटेलने मॅक्स ओडला क्लीन बोल्ड केले. यानंतर पुढे 10व्या षटकात 47 धावांवर नेदरलँड्सला तिसरा धक्का बसला.

पुढे नेदरलँड्सला 16व्या षटकात सहावा धक्का बसला. शमीने टीम प्रिंगलला कोहलीच्या हातात झेलबाद केले. प्रिंगलला 15 चेंडूत 20 धावा करता आल्या. यानंतर 17व्या षटकात भुवनेश्वर कुमारने कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला झेलबाद करून नेदरलँड्सला सातवा धक्का दिला. एडवर्ड्सला पाच धावा करता आल्या. नेदरलँड्सच्या 17 षटकांत 7 बाद 96 धावा.

यानंतर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारतीय संघाला आठवे यश मिळवून दिले आहे. पुढे फ्रेड क्लासेनच्या रूपाने भारतीय संघाला नववे यश मिळाले आहे. एलबीडब्ल्यू करताना अर्शदीप सिंगने क्लासेनला पॅव्हेलियनमध्ये जाण्यास भाग पाडले. नेदरलँडचा संपूर्ण संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 123 धावा करू शकला. नेदरलँडकडून टीम प्रिंगलने 20 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली.

महत्वाच्या बातम्या :

IND vs NED | नवी दिल्ली : आज T20 विश्वचषक 2022 चा 23 वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या