fbpx

भारताची दणदणीत सुरवात , किवी गोलंदाज हताश

टीम महारष्ट्र देशा : माऊंट माऊंगानुई येथे सुरु असलेल्या भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करत न्यूझीलंड समोर 325 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. सलामीच्या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगलेच पिसले असून दोन्ही सलामीवीरांनी आपली अर्धशतके पूर्ण केली.

शिखर धवन ने 66 तर रोहित शर्मा ने 87 धावा करून भारताला धडाकेबाज सुरवात करून दिली. त्यानंतर विराट कोहली (43) , अंबाती रायडू (47) , एम एस धोनी (48*) केदार जाधव (22*) या तिघांनी देखील या धडाकेबाज सुरवातीचा फायदा घेऊन आक्रमक फलंदाजी केली. न्यूझीलंडच्या गोलंदाज आज मात्र हताश होते. तरी फर्ग्युसन आणि बोल्ट यांनी अनुक्रमे 2 विकेट घेतल्या.

न्यूझीलंडला आता जिंकण्यासाठी 50 षटकात 325 धावांची गरज आहे.