आयसीसीच्या क्रमवारीत भारताची मिताली अव्व्ल स्थानी

mitali

नवी दिल्ली : आयसीसीने नुकतीच क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यात महिला क्रिकेटपटूंच्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज संयुक्तपणे अव्व्ल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिजेल ली ही मिताली सोबत पहिल्या स्थानी आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात लिजेलने ९१ धावांची दमदार खेळी केली होती.

मिताली आणि लिजेल या दोघींचे ७६२ असे सारखे गुण आहेत. तसेच या क्रमवारीत भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना ९व्या स्थानी आहे. तसेच टी ट्वेंटी क्रमवारीत भारताची छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्माने ७५९ गुण मिळवत पहिले स्थान कायम ठेवले आहे. तर स्मृती टी ट्वेंटी मध्ये तिसऱ्या स्थानी आहे.

एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी पाचव्या स्थानी तर फिरकीपटू पूनम यादव सहाव्या स्थानी आहे. तसेच अष्टपैलूंच्या क्रमवारीत दीप्ती शर्मा पाचव्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या