‘भारताचे ‘हे’ दोन खेळाडू न्यूझीलंडवर पडू शकतात भारी’ ; माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी

भारत

मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सामन्याआधी  माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने  एक भविष्यवाणी केली आहे. पटेलच्या मते भारताचे दोन खेळाडू न्यूझीलंडवर भारी पडू शकतात. त्यामध्ये फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि गोलंदाज मोहम्मद शमी यांचे नाव घेतले आहे.

‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात पटेल म्हणाला, ”भारताला जर या सामन्यात विजय मिळवायचा आहे, तर पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी खेळवायला हवे. जर पुजारा सामन्यात 3-4 तासही क्रिजवर राहतो तर भारत उत्तम स्थितीत पोहचू शकतो आणि पुजारा या  टेस्टमध्ये सर्वाधिक रन बनवेल असाही मला विश्वास आहे.” फलंदाजीसह उत्कृष्ट गोलंदाजी कोहलीच्या संघाला जिकंवून देईल. तसेच भारतीय गोलंदाजाच्या ताफ्यात मोहम्मद शमीची भूमिका महत्त्वाची असेल.”

महत्वाच्या बातम्या

IMP