भारताचा ‘हा’ स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती

हरियाणा: कोरोना वायरसचा धोका पाहून पंतप्रधान मोदींनी भारतात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाच्या वाढत्या विषाणूमुळे जगभरात दहशतीचे वातावरण आहे, त्यामुळे भारत सरकारने संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. तर क्रिकेट विश्वावर देखील याचे परिणाम दिसून येत आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, क्रिकेटपटू स्वत: च्या घरात राहून स्वत: ला अलग ठेवण्याची प्रक्रिया अवलंबत आहेत आणि त्याच वेळी चाहत्यांना घरात राहण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान, 2007 च्या टी -20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात चमकदार गोलंदाजी करणारा जोगिंदर शर्मा भारत बंदच्या काळात पोलिसी वेशात जनजागृतीचे कर्तव्य बजावताना दिसत आहे.

क्रिकेटपासून विभक्त झाल्यानंतर जोगिंदर शर्मा हा पोलिसात भारती झाला. सध्या तो हरियाणा पोलिसात डीएसएसपीच्या पदावर आहे. अशा परिस्थितीत जोगिंदर शर्मा आपले कर्तव्य चोख बजावत आहे, कर्फ्यूच्या काळात जे घराबाहेर पडत आहेत आशा लोकांना परत घरी पाठविण्याचे काम करीत आहे.

जोगिंदर शर्माने ट्विटरवर काही फोटो पोस्ट करून सल्ला दिला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘स्वत: चा बचाव करा आणि आम्हालाही कोरोनव्हायरसपासून वाचवा, आपण एकत्रितपणे लढा देऊ शकतो आणि घरी राहून तुम्ही आमचीही मदत करा’.