भारताचा मित्र असलेल्या ‘या’ राष्ट्रात चीनपेक्षा जास्त लोकांना झालाय संसर्ग

नवी दिल्ली : जगभरात जीवघेणा कोरोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील 170 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत जगभरात साडेसहा हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 31 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमधील मृतांचा आकडा दहा हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 92 हजार 472 आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 5 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्यांचा आकडा 73 हजार 235 वर पोहोचला आहे.

दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे 1 लाख 23 हजार 750 बाधित आहेत. ज्यापैकी 2227 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये निर्माण झालेल्या या व्हायरसने आतापर्यंत 3300 लोकांचा बळी घेतला आहे. तर 81439 लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये आता नव्या रूग्णांची संख्या घटली असून 40 ते 50 रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.