भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकाराला गुगलने आज डुडलद्वारे वाहिली आदरांजली

टीम महाराष्ट्रा देशा: स्वातंत्र्य लढ्याच्या अखेरच्या पर्वात पंडित नेहरु, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची, तसेच, स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक महत्त्वाच्या घटना, त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार होमाई व्यारावाला यांना गुगलने आज डुडलद्वारे आदरांजली वाहिली. होमाई व्यारावाल यांनी स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना घडमोडींची छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती.

होमाई व्यारावाला यांचा जन्म 9 डिसेंबर 1913 रोजी गुजरातमधील नवसारी येथील एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. आपल्या मित्राकडून त्यांनी फोटोग्राफी शिकली. 1942 मध्ये दिल्लीत वास्तव्याला आल्यानंतर, त्यांनी पत्रकारितेसाठी फोटोग्राफीला सुरुवात केली आज त्यांची १०४ वी जयंती आहे त्यानिमित्ताने गुगाने खास डूडलच्या माध्यमातून आदराजली वाहिली आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...