भारतात पहिल्यांदाच!  स्नॉवेलचा ऑडिओ-शो प्रीमियर

पुणे: ऑडिओबुक्स आणि श्राव्य माध्यमामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे स्नॉवेल आता, ‘ती परत येईल’ह्या मूळ रोमांचक गूढकथेसह एका नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. एका वेगळ्या प्रकारचा श्राव्य अनुभव देण्यासाठी, पीव्हीआर पुणे येथे स्नॉवेलने भारतात प्रथमच ‘ऑडिओ शो’च्या प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. गिरीश ओक यांचा प्रमुख आवाज असलेल्या कथेचे शिरीष देखणे हे लेखक आहेत, तर अंजली कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले आहे. खास करून श्राव्य माध्यमासाठी कथा ही लिहिण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धाची पाश्वभूमी असलेल्या या कथेचे कथानक सुयोग्य श्राव्य अनुभवासाठी अनेक अनपेक्षित वळणे घेत श्रोत्यांना खुर्चीला खिळवून ठेवते.
रारंग ढांग, प्रेषित, वनवास, समुद्र, सत्यजित राय यांच्या कथा, कुमाऊँचे नरभक्षक, खेकडा, सारे प्रवासी घडीचे, दि. बा. मोकाशी यांच्या कथा यासारखे अनेक दर्जेदार श्राव्यानुभव यासाठी स्नॉवेल विख्यात आहे. ‘‘ती परत येईल?’’ ही नवीन कलाकृती श्रोत्यांचे कान आणि मन तृप्त करेल यात शंकाच नाही.

शनिवार, 12 मे रोजी सेनापती बापट रोडवर असणाऱ्या पीव्हीआर आयकॉन येथे हा ऑडिओ शो आयोजित करण्यात आला होता. थिएटरसारख्या बंद वातावरणात गोष्ट ऐकणे हा रसिक श्रोत्यांसाठी निश्चितच एक विलक्षण अनुभव ठरला आहे. यावेळी निर्माते नितीन वैद्य, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, लेखिका मनस्विनी लता रवींद्र, दिग्दर्शक वरुण नार्वेकर, गायक-लेखक डॉ. आशुतोष जावडेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

Comments
Loading...