भारताची ‘अर्थव्यवस्था’ चुकीच्या दिशेनं मार्गस्थ :अर्थतज्ञ अमर्त्य सेन

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था चुकीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे असं प्रख्यात अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी वक्तव्य केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मात्र 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेनं चुकीच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे अशी टीका सेन यांनी केली आहे.

आपल्या देशाची आर्थिक वाटचाल उलट दिशेनं सुरू आहे. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था अशी भारताची ओळख होती. मात्र 2014 पासून आर्थिक परिस्थितीचे चित्र अतिशय निराशाजनक आहे. सध्या भारत हा वेगानं पिछाडीवर जात आहे,’ असं सेन म्हटले. नोबेल पुरस्कारप्राप्त अमर्त्य सेन यांच्या ‘भारत और उसके विरोधाभास’ या पुस्तकाच प्रकाशन काल झालं, हे पुस्तक सेन यांच्याचं ‘अॅन अनसर्टन ग्लोरी: इंडिया अॅण्ड इट्स कॉन्ट्रॅडिक्शन’ पुस्तकाचं हिंदी लिखाण आहे.

वीस वर्षांपूर्वी श्रीलंका,नेपाळ, बांगलादेश, भूतान आणि पाकिस्तान या देशांशी तुलना करता पूर्वी भारताची परिस्थिती चांगली होती. पाकिस्तानची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यानंतर आपला क्रमांक लागतो,’ असं सेन म्हणाले. सर्वोत्तम अर्थव्यवस्थेत भारताचा क्रमांक त्यावेळी दुसरा होता. मात्र आता भारताची अवस्था अतिशय वाईट आहे असं सेन म्हणाले.

मोदी काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावर गप्प का ? : मायावती

Rohan Deshmukh

‘जेडीयू’चं ठरलं ! २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ बरोबरच !

रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेचं मुसळधार आंदोलन

 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...