भारताची अर्थव्यवस्था गडगडली, जागतिक क्रमवारीत मोठी घसरण

narendra modi sad

टीम महाराष्ट्र देशा : भारताला जागतिक बँकेने दिलेला जगातली ५ व्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा भारताने गमावला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची गेल्या काही वर्षात पडझड झाली आहे. त्यामुळे जगतीक बँकेच्या आकडेवारीनुसार भारत आता ७व्या क्रमाकांकावर आला आहे. तर जागतिक बँकेच्या आकड्यांनुसार वर्ष 2018 मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत पुढे आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेनं वर्षं 2018मध्ये सुस्त राहिल्यानं त्याचा मोठा भुर्दंड देशाला बसला आहे. त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनी भारताला मागे टाकले आहे. सध्य स्थितीला इंगलंड हे ५ व्या स्थानावर आहे, तर फ्रान्सने ६ व्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. तर नेहमीप्रमाणे अमेरिकेने आपले प्रथम क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था वर्षं 2018मध्ये 3.01 टक्क्यांनीच वाढली आहे. तर वर्षं 2017मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत 15.23 टक्क्यांची वाढ झाली होती. त्याचप्रमाणे ब्रिटनची अर्थव्यवस्थेत 6.81 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तिच्या अर्थव्यवस्थेत 2017मध्ये फक्त 0.75 टक्के एवढीच वाढ झाली होती. दुसरीकडे फ्रान्सची अर्थव्यवस्था 2018मध्ये 7.33 टक्क्यांनी वाढली आहे. जी 2017मध्ये फक्त 4.85 टक्क्यांपर्यंत वाढली होती.