fbpx

सर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई

टीम महाराष्ट्र देशा : भारत-पाकिस्तान सीमेवर अनेक चकमकी होत असतात पण आज भारताने जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर मोठा धमाकाचं केला आहे. या धमाक्यात पाकिस्तानच्या 5 जवानांना ठार करण्यात आलं असून पाकचे अनेक बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. सर्जिकल स्ट्राईक नंतर केलेली सर्वात मोठी कारवाई असून पाकिस्तानी रेंजर्संच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तान सैन्य नेहमीच शस्त्रसंधीचे उलंघन करत असते पण आज भारताने मात्र त्यांच्या या खोडसाळ वृत्तीला चांगलेच प्रत्युत्तर देले आहे. पुंछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न केला जात होता पण हा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावला तसेच पाकिस्तानच्या पाच रेंजर्संना कंठस्नान घातले.

याबाबत लष्करी कारवाईचे अधिकारी रणबीर सिंग यांनी माहिती दिली. तसेच पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल व त्यासाठी भारतीय सैन्य नेहमी तयार आहे, असेही सिंग यांनी म्हटले.

1 Comment

Click here to post a comment