गुलाल आमचाच : सुपरओव्हरमध्ये पुन्हा भारताची बाजी

टीम महाराष्ट्र देशा – वेलिंग्टन येथे पार पडलेल्या चौथ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा भारताने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे. या पराभवासह भारताने 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे.तिसऱ्या सामन्यात देखील भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. याच विजयाची पुनरावृत्ती भारताने आजच्या सामन्यात केली. भारताच्या 165 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ देखील 165 धावाच करू शकला.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडकडून कॉलिन मुन्रो आणि टिम सेफ सेफर्ट उतरले होते. भारताकडून बुमराहने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने टिन सेफर्टची विकेट गमावत 13 धावा केल्या होत्या.

Loading...

यानंतर भारताकडून विराट आणि केएल राहूल ही जोडी मैदानात उतरली. तर न्यूझीलंडकडून साउदीने गोलंदाजी केली. पहिल्याच चेंडूवर षटकार व दुसऱ्या चौकार मारत केएल राहुलने भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. तिसऱ्या चेंडूवर केएल राहूल बाद झाल्यानंतर अखेर विराटने चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि 5व्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

हेही पहा

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार