fbpx

नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, सामन्यासह मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी

टीम महाराष्ट्र देशा : चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. लयीत नसलेल्या अंबाती रायडू च्या जागी लोकेश राहुल, धोनीच्या जागी रिषभ पंत, जडेजाच्या जागी चहल तर मो.शमीच्या जागी भुवनेश्वर कुमारला या सामन्यात संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात नॅथन लायनच्या जागी टर्नर ला संधी देण्यात आली आहे.

मोहालीत खेळल्या जाणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी भारतीय संघाला आहे. चौथा सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजी साठी अनुकूल आहे. भारतीय संघ ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे कर्णधार विराट कोहली चांगल्या लयीत आहे. त्याने मागील दोन्ही सामन्यात शतक झळकावले आहे. या सामन्यात यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी विश्रांती दिली जाणार आहे त्यामुळे यष्टीरक्षणाची जबाबदारी रिषभ पंत वर असणार आहे.

ऑस्ट्रेलिया साठी जमेची बाजू म्हणजे त्यांचे दोन्ही सलामीवीर चांगल्या लयीत आहेत. मागच्या सामन्यात उस्मान ख्वाजा ने शतकी तर कर्णधार अरोन फिंच ने अर्धशतकी खेळी केली होती त्यांना रोखण्याचे आवाहन भारतीय गोलंदाजांना असणार आहे. भारतीय संघासाठी सलामीची जोडी डोकेदुखी ठरत आहे. दोनही सलामीवीरांना मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. दोन्ही संघांच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर सगळ्यांचे लक्ष असणार आहे