स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 50 टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून काळा पैसा रोखण्याचा दावा केला जात होता, मात्र स्विस बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अहवालातून, यातील फोलपणा समोर आलाय. केंद्र सरकारने काळ्यापैश्याविरूद्ध मोहिम छेडली असताना स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेल्या पैशात वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 50 टक्क्यांनी जास्त आहे.

bagdure

स्वित्झरलँडच्या केंद्रीय बँकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती पुढे आली आहे.गेली तीन वर्ष स्विस बँकेत भारतीयांनी जमा करण्यात येणाऱ्या पैशात घट झाली होती. मात्र आता ही रक्कम 7 जार कोटींवर गेली आहे.

2016 मध्ये भारतीयांच्या पैश्यात मोठी घट होऊन हा पैसा 45 टक्के एवढा कमी झाला होता. ही रक्कम 4 हजार 500 कोटी रूपये एवढी होती. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात रक्कम स्विस बँकेत जमा करण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...