महिला ट्वेंटी- 20 विश्वचषकात भारताचा रोमहर्षक विजय ; स्मृती मानधनाला दुखापत

टीम महाराष्ट्र देशा : आयसीसी महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी- २०  विश्वचषकाचा सलामीच्या भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला १३३  धावांचे आव्हान दिले होते. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. मात्र भारतीय संघाची गोलंदाज पूनम यादवच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने झटपट विकेट्स गमावले.

ऑस्ट्रेलियाची विकेटकीपर अलिसा हेली सर्वाधिक ५१  धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची फलंदाज अश्ले गार्डनर शेवटपर्यत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिखा पांडेने तिला झेलबाद करत विजयाचा मार्ग मोकळा केला.

Loading...

अश्ले गार्डनरने ३६ चेंडूत ३४ धावा केल्या. भारताीय संघाची गोलंदाज पूनम यादवने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर शिखा पांडेला दोन विकेट्स आणि राजेश्र्वरी गायकवाडला एक विकेट्स घेण्यात यश मिळाले.

दरम्यान भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. भारताने चार षटकांमध्ये ४१  धावा केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाची फिरकीपटूने स जोनासेनने भारताची सलामी फलंदाज स्मृती मानधना १०  धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. आपला पहिला ट्वेंटी- २० विश्वचषक सामना खेळणारी शफाली वर्मा फटकेबाजीच्या प्रयत्नात माघारी परतली. तिने धमाकेदार खेळी करत ५ चौकार आणि १  षटकार लगावला, पण १५  चेंडूत २९ धावा करून ती बाद झाली.

ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडला शफालीला झेलबाद करण्यात यश आले.भारताची अनुभवी कर्णधार हरमनप्रीत कौर देखील फक्त 2 धावा करत यष्टीचीत झाली. यानंतर दिप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जेमिमाला डेलिसा किमिन्सेने पायचीत केले. जेमिमाने ३३  चेंडूत २६  धावा केल्या. त्यामुळे दीप्ती शर्मा आणि जेमिमाच्या धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले होते.

स्मृती मानधनाला दुखापत

या सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला १३३  धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताने ऑस्ट्रेलिया संघाला ११५  धावातच गुंडाळले. भारतासाठी हा विजय आनंददायी असला तरी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.भारतीय संघाची सलामी फलंदाज स्मृती मानधनाला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आहे.

स्मृती क्षेत्ररक्षण करत असताना सीमाबाहेरील असणाऱ्या बोर्डावर आदळल्याने तिला खांद्याला दुखापत झाली. या सर्व घटनेनंतर फिजिओंनी स्मृतीला मैदानाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही वेळात स्मृती पुन्हा मैदानात उतरली असली तरी दुखापतीचा त्रास जास्त झाल्यास भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....