भारतीय महिला संघाचा धडाका, विंडीजविरुद्धची मालिका जिंकली

टीम महाराष्ट्र देशा- भारत आणि वेस्ट इंडीजच्या महिला संघात झालेल्या मर्यादित 50 षटकांच्या सामन्यांची मालिका भारतीय संघानं काल जिंकली. कालच्या अखेरच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत यजमान वेस्ट इंडीजनं 50 षटकांत सर्व गडी बाद 194 धावा केल्या तर भारतीय संघानं 42 व्या षटकातच 4 गडी बाद 195 धावा करत मालिका 2-1 अशी जिंकली.

भारताच्या स्मृती मानधना हिला सामनावीर घोषित करण्यात आलं. तर दुसरीकडे भारत आणि बांगलादेशविरुद्धच्या वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतल्या काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं बांगलादेशवर आठ गाडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली

विंडीजने दिलेल्या १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा आणि स्मृतीने १४१ धावांची सलामी दिली. जेमिमाने ९२ चेंडूंत ६ चौकारांसह ६९ धावा केल्या. यानंतर स्मृतीही माघारी परतली. स्मृतीने ६३ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ७४ धावा केल्या. बोटाच्या दुखापतीमुळे स्मृती मागील दोन्ही लढतींत खेळू शकली नव्हती.

यानंतर पूनम राऊत आणि मिताली राजने सावध फलंदाजी केली. विजयासाठी पाच धावांची गरज असताना पूनम आणि मिताली बाद झाल्या. दीप्ती शर्माने ४२.१ षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

महत्वाच्या बातम्या