ICC Women’s World Cup 2017- भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज श्रीलंकेशी सामना

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आज इंग्लंडच्या डर्बी इथे भारतीय संघाचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल. या स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आणि इंग्लंड संघांवर सलग विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संघाचे सहा-सहा गुण मिळवले असून, चांगल्या रन रेटमुळे भारतीय संघ प्रथम क्रमांकावर आहे.

सिंधुदुर्गकन्या पूनम राऊत या स्पेर्धेत जोरदार कामगिरी करतेय. तिच्यासह स्मृती मानधना .मिताली राज,एकता बिस्ता आणि झुलंन गोस्वामीहि चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.मिताली राज ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनणार की नाही हे आज होऊ शकते. श्रीलंका आणि भारतीय संघात तुलना केली तर भारतीय संघ हा मजबूत असून श्रीलंका संघ तेवढाच दुबळा आहे.

महिला विश्वचषक उपांत्यफेरीसाठी आजचा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे.

भारतीय महिला संघ- मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्‍त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्‍वरी गायकवाड, पूनम यादव व नुझत परवीन.

श्रीलंका महिला संघ- इनोका रणवीरा (कर्णधार), चमारी अटापट्टू, चंडिमा गुणरत्ने, निपुणी हंसिका, ऍमा कांचना, ईशानी लोकुसुरिया, हर्षिता माधवी, दिलानी मनोदरा, हसिनी परेरा, चमारी पोलगमपाला, उदेशिका प्रबोधिनी, ओशादी रणसिंघे, शशिकला सिरिवर्धने, प्रसादिनी वीराकोड्डी व श्रीपाली वीराकोड्डी.

You might also like
Comments
Loading...