इस्राईलमध्ये पॅलेस्टाईनने केलेल्या हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू

saumya santosh

जेरुसलेम : गेल्या काही दिवसांपासन इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष वाढला आहे. इस्लामी गट आणि इतर पॅलेस्टाईनमधील अतिरेक्यांनी तेल अवीव आणि बिर्शेबा येथे रॉकेट हल्ले केल्यामुळे इस्रायलने बुधवारी सकाळी गाझावर १३० पेक्षा जास्त हवाई हल्ले केले आहेत.

इस्त्रायलने दिलेल्या या चोख प्रत्युत्तरात ३५ पॅलेस्टाइनमधील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर इस्त्रायलमधील पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याआधी गाझा पट्टीवरील हमास या संघटनेने आणि कट्टरतावाद्यांनी तेल अविव येथे १३० रॉकेट सोडले होते.यानंतर इस्त्रायलने एयरस्ट्राईक केला आहे. ज्यामध्ये गाझा येथील एक निवासी इमारत उद्धवस्त करण्यात आली आहे.

दरम्यान,पॅलेस्टाइनने केलेल्या या हल्ल्यांमध्ये एका भारतीय महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. इस्त्राईलच्या सैन्याचे प्रवक्ते जोनाथन कोनरिकस यांनी दिलेल्या माहितीनुसार, हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यातील एक रॉकेट अश्कलोन शहरातील इमारतीवर पडले. या हल्ल्यात भारतातील केरळच्या सौम्या संतोष यांचा मृत्यू झाला आहे. सौम्या 80 वर्षीय इस्त्राईली महिलेची केअर टेकर होती अशी देखील माहिती आता समोर आली आहे.

दरम्यान,जेरुसलेममधील वाढता हिंसाचार पाहता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने सोमवारी आपत्कालीन बैठक बोलावली होती. यावेळी इस्राईलला संयम आणि शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, पवित्र स्थळांचा आदर करण्याचेही आवाहन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या