मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पराभवाचा सामना केल्यानंतर आता भारतीय भूमीवर होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. बुधवारी संध्याकाळी संघाची घोषणा झाल्यानंतर रोहित शर्मा (rohit sharma) औपचारिक रित्या सगळ्या फॉरमॅटचा कर्णधार म्हणून घोषित झाला आहे.
बीसीसीआयने त्यांच्या सोशल मिडियावर खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. दुखापतीतून बाहेर येत रोहित शर्माचा कर्णधार म्हणून हा पहिला दौरा असणार आहे. सोबतच आवेश खान एकदिवसीय संघात तर रवी बिष्णोई दोन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी पर्दापण करणार आहे. बऱ्याच काळापासून खराब कामगिरीमुळे वगळला गेलेल्या कुलदीप यादवचेही संघात पुनरआगमन झाले आहे. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच रोहित आणि विराट सोबत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आता रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ कसा परफॉरमेन्स देतो याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (captain), केएल राहुल (vc), रुतुराज गायकवाड, शिखर धवन , विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (wk), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर , रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसीध्द कृष्णा, आवेश खान
टी ट्वेंटी : रोहित शर्मा (captain), केएल राहुल (vc) , इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (wk), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर, आवेश खान, हर्षल पटेल
महत्वाच्या बातम्या
- राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्र सरकारकडेच द्या- चंद्रकांत पाटील
- ‘त्या’ चर्चांना उधान; गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजनांच्या घरी
- ध्वजारोहणावेळी रश्मी आणि आदित्य ठाकरेंनी केला आचारसंहितेचा भंग; मुंबईत तक्रार दाखल
- “ज्याच्यात दम असतो तो निवडून येतो”, नगरपंचायत निवडणुकीवरून गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका
- …त्या कार्यक्रमातील ६३ सहभागींपैकी मी एक होतो- किरीट सोमय्या