वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शिखर धवनला डच्चू; ‘या’ युवा चेहऱ्यांना मिळाली संधी

नवी दिल्ली : 4 आॅक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे. धवनला वगळून मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.

निवड समितीने शिखर धवन, मुरली विजय आणि इशांत शर्मा यांना संघातून वगळले आहे. अपेक्षेप्रमाणे पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. राजकोट आणि हैदराबाद येथे हे सामने होणार आहेत.

या आॅगस्ट-सप्टेंबर दरम्यान झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शिखरने खेळलेल्या चार कसोटीत त्याने 26,13,35,44,23,17,3,1 अशा मिळून 20.25 च्या सरासरीने 162 धावा केल्या होत्या.त्याच्या या अशा कामगिरीमुळे निवड समितीने त्याला विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पूजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), हनुमान विहारी, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.