टीम महाराष्ट्र देशा : आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात नवदीप सैनी आणि राहुल चाहर यांना प्रथमच संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच तीनही संघांचे नेतृत्व पुन्हा एकदा विराट कोहलीकडे देण्यात आले आहे.
एकदिवसीय संघात श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि खलील अहमदचे पुनरागमन झाले आहे. तर नवदीप सैनीला प्रथमच संधी मिळाली आहे. टी ट्वेंटीसाठी राहुल चाहर हा नवीन चेहरा आहे. तर कसोटी संघात वृद्धिमान साहाचे पुनरागमन झाले आहे.
कसोटी संघ कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, उमेश यादव
एकदिवसीय संघ
विराट कोहली (कप्तान), रोहित शर्मा (उपकप्तान) , शिखर धवन, के एल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खालील अहमद, नवदीप सैनी
टी- 20 संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), कृणाल पंड्या, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर , नवदीप सैनी