fbpx

पाकड्यांचा पुळका, मुशर्रफच्या नातेवाईकाच्या मेहंदीमध्ये गायला ‘हा’ भारतीय गायक

टीम महाराष्ट्र देशा- जम्मू- काश्मीर येथून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. भारताच्या भूमिकेला पाकिस्तानने विरोध दर्शवत भारतासोबतचे व्यवसाय पूर्णपणे बंद केले आहेत. पाकडे एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी भारतीय सिनेमांवरही बंदी घातली आहे.

युद्धाची खुमखुमी आलेल्या याच पाकिस्तानात जाऊन बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगने कराची येथे एक सिंगिंग परफॉर्मन्स दिला. याबद्दलची माहिती समोर आल्यानंतर मिका चांगलाच टीकेचा धनी बनला आहे. ट्विटरवर मिकाच्या पाकिस्तानमधील कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायल झाला आहे. यावरूनच त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

पाकिस्तानची पत्रकार नायला इनायतने माजी पाकिस्तानी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांच्या एका नातेवाईकाच्या मेहंदीचा कार्यक्रम असल्याचं म्हटलं. हे कळल्यानंतर भारतीय युझर्सने गायक मिका सिंगला सोशल मीडियावर शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे.

महत्वाच्या बातम्या