Asian Games Live : भारताचा धावपटू जिन्सन जॉन्सनला सुवर्ण

जकार्ता – आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बाराव्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. भारताचा धावपटू जिन्सन जॉन्सनने भारताला 1500 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकवून दिले. जॉन्सनने 1500 मी. हे अंतर 3:44.72 मिनिटांमध्ये पूर्ण केले आणि अव्वल स्थानासह सुवर्णपदक जिंकले.

आजच्या दिवसातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. याच क्रीडा प्रकारात भारताला मनजीत सिंह देखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता, मात्र अखेरीस तो चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे भारताला एकाच पदकावर समाधान मानावं लागलं.

याआधी बुधवारी झालेल्या ८०० मी. शर्यतीत जॉन्सनने रौप्यपदकाची कमाई केली होती. मात्र त्या स्पर्धेतली कसर भरुन काढत जॉन्सनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

You might also like
Comments
Loading...