fbpx

हिमा दासची पोलंडमध्ये ‘सुवर्ण’ कमाई, २०० मीटर अंतर २३.६३ सेकंदात पार

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय धावपटू हिमा दासने पोजनान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स या पोलंडमधील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत हिमाने २०० मीटर अंतर २३.६३ सेकंदात पार करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या कामगिरीवर हिमा दासला आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने हिमा त्रासलेली होती तर यातून बाहेर पडत तिने अव्वल क्रमांक प्राप्त केला व तिने शर्यत २३.६३ सेकंदात सर्वाना मागे टाकत जिंकली. याआधी हिमाचा २०० मीटर स्पर्धेत २३.१० सेकंद एवढा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे.

पोलंडमधील स्पर्धेतील कामगिरीबाबत आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. तर याआधी आयएएएफ वर्ल्ड अंडर -20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी हिमा भारतातील पहिली महिला खेळाडू आहे.