फेक न्यूजवरून मोदी सरकारचा यूटर्न; पत्रकारांवरील कारवाईचा आदेश मागे घेण्याची नामुष्की

टीम महाराष्ट्र देशा : फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता, याबाबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध होताच असा निर्णयकरून सरकार विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र हा निर्णय घेऊन काही तास उलटायच्या आतच आपलाच निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली आहे.

देशभरातील काही पत्रकार आणि संस्था फेक न्यूज प्रसिद्ध करत असल्याच निदर्शनात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे फेक न्यूजला चाप बवण्यासाठी पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी अधिस्वीकृतीच रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता.

माहिती आणि प्रसारण विभागातील मार्गदर्शक तत्त्वांमध्येही तसा बदल करण्यात आल्याचा दावादेखील करण्यात आला, मात्र यावेळी ‘फेक न्यूज’ची नेमकी व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नव्हती. मात्र देशभरातून टीका होऊ लागल्याने निर्णय मागे घेत असल्याचा पत्रक केंद्र सरकाकडून काढण्यात आल आहे.