इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावाची तारीख ठरली, ‘या’ महिन्यात असेल लिलाव

टीम महाराष्ट्र देशा:- पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग लिलावाची तारीख घोषित झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी ही स्पर्धा एप्रिलमध्ये खेळवण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी डिसेंबर 2019मध्ये लिलाव होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीनंतर अनेक खेळाडूंसाठी आयपीएल मालकांनी कंबर कसली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा ही मार्चपासून सुरू करावी लागली होती. पण, आता तो मुद्दा येणारच नाही कारण आसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबरमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान पटकावण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा लिलाव हा डिसेंबर मध्ये होणार आहे. परंतु लिलावाची रातीख अद्याप ठरलेली नाहीये. मात्र यावेळी यावेळी फ्रेंचायझी 3 कोटी रूपये आपल्या अकाऊंटमध्ये टाकू शकतात, मात्र यासंबंधी अधिकृत माहिती आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या