‘भारतीय मुस्लिमांनी ईसीसच्या थेअरीला रिझेक्ट केले’

औरंगाबाद: नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने सर्व समाजातील व घटकांतील लोकांना एकमेकांसोबत जोडले. जगभरात अनेक मुस्लिम देशाचे लोक ईसीस आणि बगदादीच्या जाळ्यात अडकले आहे. मात्र भारताचा मुस्लिम इंडोनियानंतर दुसरी मोठी लोकसंख्येच्या देशातील मुस्लिमांनी आयएसएआयच्या थेरीला रिझेक्ट केले. कारण इकडे सगळे एकत्र रहातात.त्यांना कुठलीच अडचण नसल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसैन यांनी बुधवारी (ता.9) सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारासाठी हुसैन राज्याच्या दौऱ्यावर आहे. बुधवारी ते औरंगाबादेत होते. त्यानंतर गुरवारी ते लातूरला जाणार आहे. हसैन म्हणाले, या प्रमाणे सुर्योदय अटळ आहे, त्याच प्रमाणे राज्यात भाजप-शिवसेनाची सरकार बहुताने येणार हे पक्के आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाची वाईट परिस्थिती आहे. त्यांचे नेते राहुल गांधी पक्षाला सोडून कंबोडीयाला गेले. त्यांना माहिती आहे, महाराष्ट्र आणि हरियाणात कॉंग्रेसला सिंगल डिजिट सीट मिळणार आहे. कॉंग्रेसची ही पहिली अशी निवडणुक आहे. की त्यात उमेदवार मिळत नाही. जे उमेदवार आहेत. ते कॉंग्रेस आपल्या वैयक्तिक ताकतीवर निवडणुक लढवत आहे. ते पक्षाच्या नावावर निवडणुक लढवत नाही.

विरोधकांकडून राफेला विरोधच

विजया दशमीच्या महुर्तावर देशाला राफेल मिळाले. हे विजया दशीमला कसे मिळाले असे प्रश्न कॉंग्रेसचे नेते संदीप दिक्षित, आलका लांबा यांनी उपस्थित केले. कॉंग्रेसच्या नेत्यांना हे माहिती पाहिजे की हा सयोग आहे. विजयादशमीच्या दिवशीच वायुसेना दिवस आहे, त्याचबरोबर विजयादशमीच्या दिवशी शस्त्राची पुजा केली जाते. देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल हे देशाचे शस्त्र म्हणून त्यांची पूजा केली. यात कॉंग्रेसला काय अक्षेप आहे. कॉंग्रेसच्या काळात असे नारळ फोडून पुजा झाली नाही का? असा प्रश्नही हूसैन यांनी उपस्थित केला.ज्यावेळी दहा वर्षे कॉंग्रेस सत्तेत होते, तेव्हा राफेल रोखून ठेवले होते. जेव्हा ते विरोधात आले तेव्हाही पाच वर्षे राफेल रोखण्याचे काम केले. परंतु मोदी हे तो मुमकिंग आहे. देशाच्या वायुसेना मजबूत करण्याचे काम केले. राफेल मिळाल्याने पाकिस्ताने परेशान व्हावे कॉंग्रेसने नाही. असा टोलाही हुसैन यांनी लगावला.

एमआयएम कॉंग्रेसची बी टीम

जोडो और आगे बडो हे आमचे काम आहे. त्यानुसार आमच्या विचाराल्या लोकांना सोबत घेऊन आम्ही पुढे जात आहोत. मागच्या वेळी काही मतदानाचे विभाजन झाले. अन्यथा इथे एमआयएम निवडुन आले नसते. एमआयएम ही भाजपची नव्हे तर कॉंग्रेसची बी टीम म्हणून काम करीत आहे. या निवडणुकीत मराठवाड्यात भाजप-शिवसेना युती सर्वंच जागा जिंकेल आणि एमआयएम कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकही सिटी मिळणार नाही.