fbpx

तिरंग्यासाठी खलिस्तानवादी आणि पाकड्यांशी भिडली एकटी भारताची वाघीण

टीम महाराष्ट्र देशा : १५ ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्यदिन भारतातच नाही तर जगभरात मोठ्या जल्लोषात साजरा झाला. देशभरात मोठ्या अभिमानाने आणि गर्वाने आपण हा दिन साजरा करत असताना तिकडे लंडनमध्ये अशी घटना घडली की जिचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.

15 ऑगस्ट रोजी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालया बाहेर पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थकांनी विरोध प्रदर्शन केले एवढेच नाही तर त्यांनी भारतीय तिरंग्याचा अपमान करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु, तिथे उपस्थित असणाऱ्या एका महिला पत्रकाराने विरोध प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांना ते करण्यापासून रोखले. एवढंच नाही तर या भारतीय वाघिणीने सरळ त्या आंदोलनकर्त्यांच्या हातातून थेट तिरंगा घेत देशभक्तीचे आणि शौर्याचे प्रदर्शन केले.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालया बाहेर खलिस्तानवादी आणि पाकिस्तानचे समर्थक भारताने काश्मीरमुद्यावरून घेतलेल्या निर्णयाचा विरोध दर्शवण्यासाठी आले होते. परंतू, यावेळी त्यांनी भारतीय तिरंग्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याचवेळी तिथे उपस्थित असणारी भारतीय पत्रकार पुनम जोशी ही त्या आंदोलकांशी भिडल्या.

तसेच त्यांच्या हातातून तिरंगा ओढून घेतला. दरम्यान, एका वृत्तसंस्थेची पुनम पत्रकार आहे त्या वृत्तसंस्थेनी आपल्या ट्विटर आणि फेसबूक पेजवर याविषयीचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. हजारोंच्या गर्दीत जावून या महिला पत्रकाराने तिरंग्याचा मान ठेवला आणि आंदोलनकर्त्यांशी भिडल्या त्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

महत्वाच्या बातम्या