fbpx

भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ऑल्टमन्स यांची हकालपट्टी

oltmans indian hockey coach

नवी दिल्ली: रोलॅन्ट ऑल्टमन्स यांची भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. गेली दोन वर्षापासून सुरु असणारी हॉकी संघाची सुमार कामगिरी पाहता ऑल्टमन्स यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शनिवारी झालेल्या हॉकी इंडिया समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या संघाच्या उच्च कामगिरी संचालकपदी असलेले डेव्हिड जॉन संघाचे हंगामी प्रशिक्षकपद भूषवणार असल्याची चर्चा आहे. ऑल्टमन्स हे २०१३ मध्ये उच्च कामगिरी व्यवस्थापक म्हणून ‘हॉकी इंडिया’मध्ये रूजू झाले होते.