बाभूळगाव पंचायत समितीने फडकाविला फाटका राष्ट्रध्वज

यवतमाळ (संदेश कान्हु) : आज प्रत्येक भारतीय आपला राष्ट्रध्वज तिरंग्यासाठी उरात सन्मान बाळगतो तसेच तिरंग्याच्या रक्षणासाठी आपन सर्वजन कटिबद्ध असतो मात्र शासकीय कार्यालयाने राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा खळबळजनक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव पंचायत समितीचे कार्यालयावर फाटका राष्ट्रध्वज फडकताना दिसून आला . सदर प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून मागील काही दिवसांपासून इमारतीचे भिंतीला एक पाईप ठोकून कठड्याला टेकेल आशा स्थितीत राष्ट्रध्वज दररोज पंचायत समिति कार्यालयावर फड़कविला जातो.

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथान कारभारामुळे मुळे चक्क फाटका राष्ट्रध्वज कार्यालयावर दिनांक 1 ऑगस्ट रोजी दिसुन आला. लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या अनेकांच्या भुवया हा प्रकार पाहुन उंचावल्या होत्या.
यातील दोषी अधिकारी कर्मचारी यांचेवर राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. या संबंधी तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्याचे पत्र पाठविले आहे. यावर कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.