भारताचा विकासदर सात ते साडेसात टक्के; संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर

टीम महाराष्ट्र देशा: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. 2019 च्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर सात ते साडे सात टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आर्थिक अहवाल करण्यात करण्यात आल्यानंतर सेन्सेक्स देखील वाढला आहे.

जगभरात वाढत्या तेलाच्या किमती ह्या चिंतेचा विषय असल्याच या अहवाल सांगण्यात आल आहे. तसेच जीएसटीमुळे निर्माण झालेले अडथळे दूर करण्यास सरकारला यश आल्याचही यात सांगण्यात आल आहे.