International yoga day- भारतीय खेळाडूंनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

300आज आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानिमित्त सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी योग करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर आहेत. यात भारतीय खेळाडूही मागे नाहीत.

भारताचा सलामीवीर शिखर धवनने ट्विटरवर आपला योग करताना फोटो शेअर केला आहे. त्यात शिखर म्हणतो, “योग माझ्या जीवनात एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे मला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभलं आहे. ”

तर आपला मुंबईकर अजिंक्य रहाणेसुद्धा योगा करण्यात अजिबात मागे नाही. रहाणे म्हणतो, “माझ्या  दररोज शारीरिक आणि मानसिक फिट राहण्याचं रहस्य म्हणजे योग. सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा. ”