मला अशक्य असे वाटत नाही ! विराट कोहलीने आपल्या फलंदाजीबाबत केला मोठा खुलासा

Kohli virat

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपण लक्ष्याचा पाठलाग करताना कसा विचार करतो किंवा आपली मानसिकता काय असते, याचा खुलासा केला. बांगलादेशचा क्रिकेटर तमीम इकबाल याच्याशी विराट चॅट करत होता. तेव्हा त्याने याबाबत भाष्य केले.

एखाद्या लक्ष्याचा पाठलाग मर्यादित षटकात करणे हे फार अवघड असते. विशेष म्हणजे यासाठी स्थिर व खंबीर मानसिकता लागते. तर ही मानसिकता मैदानावर असताना शेवटपर्यंत टिकवून ठेवणे आवश्यक असते. याबाबतचं विराट कोहलीने खुलासा केला आहे. तर खेळताना आपली मानसिकता काय असते याबाबतही माहिती दिली.

कोहली म्हणाला की, जेव्हा एखादा विरोधी खेळाडू मला आक्रमक शॉट खेळण्यास उद्युक्त करतो किंवा स्लेज करतो तेव्हा मी आणखीनच उत्तेजित होतो. कोहली पुढे म्हणाला की, कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करणे अशक्य नसते आणि खेळाडू आपला डाव आणि भागीदारी कशी तयार करतो यावर सर्व अवलंबून असते.जेव्हा लक्ष्यांचा पाठलाग करण्याचा विचार केला जातो तेव्हा माझी मानसिक स्थिती सोपी असते – जर कोणी मला विरोधी पक्षाकडून काही बोलले तर मी अधिक प्रवृत्त होतो.

यावेळी कोहली म्हणाला की, मी लहान असताना टेलिव्हिजनवर सामने बघायचो. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सामना जिंकला नाही तर मी तिथे असतो तर हा सामना जिंकला असता, असे मला वाटायचे.

विराट कोहलीचा विक्रम; गांगुली, धोनीला टाकले मागे

पाठलाग ही अशी परिस्थिती आहे जिथे आपल्याला माहित आहे की, आपल्याला किती धावा कराव्या लागतील. माझ्यासाठी जिंकणे महत्वाचे आहे. पाठलाग करताना मला वाटतं की मी आऊट न होता संघाला विजय मिळवून देऊ शकेल. जर लक्ष्य 370 / 380 असेल तर ते करणे शक्य नाही असे मला कधीच वाटत नाही, ”असेही तो पुढे म्हणाला.

दरम्यान विराट कोहलीने आतापर्यंत वन डे क्रिकेटमध्ये 43 शतकं केली आहेत. तर यामधील सर्वाधिक शतकं ही धावांचे लक्ष्य गाठताना केली आहेत. त्यामुळे विराट कोहलीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

ही तर फक्त सुरुवात आहे: विराट कोहली