fbpx

मला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका, धोनीने दिले निवृत्तीचे संकेत

टीम महाराष्ट्र देशा : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आगामी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. या काळात तो भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंट सोबत प्रशिक्षण घेणार आहे. हे प्रशिक्षण जम्मू काश्मीर मध्ये होणार आहे. परंतु त्याला थेट ऑपरेशन मध्ये सहभाग घेता येणार नाही.

दरम्यान, मी आताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेणार नाही. पण माझी मानसिक तयारी झाली की योग्य वेळी मी तो निर्णय जाहीर करेन. तूर्तास दोन महिने प्रादेशिक सेनेसाठी काम करण्याचा शब्द मी पाळतोय. बीसीसीआयने त्यांच्या भविष्यातील योजनांत मला गृहीत धरू नये. युवा खेळाडूंना संधी द्यायला बोर्ड मोकळा आहे असं धोनीने म्हटलं आहे.

राष्ट्रीय निवडसमिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यासमोर धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर 350 वन डे क्रिकेट भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीची आता फक्त घोषणेची औपचारिकताच उरली असल्याचे उघड केली. धोनी आता कधीही आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील निवृत्तीसाठी मोकळा आहे असे प्रसाद यांनी धोनीशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले.